जळगाव;-जळगाव खुर्द व तिघ्रे शिवारातील रस्त्याच्या कामासाठी रस्त्याच्या कामासाठी आलेल्या परप्रांतिय मजूराची शेताच्या बांधावर गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , संतोष रॉय भिम रॉय (वय-२३) रा. दोंदिया पो. अम्बा जरूवाडीह जि. जरमुण्डी दुमका झारखंड ह.मु. तिघ्रे ता.जि.जळगाव हा तरूण गेल्या तीन महिन्यांपासून जळगाव खुर्द व तिघ्रे शिवारातील रस्त्याच्या कामासाठी मजूरीचे कामासाठी आला आहे. काल रविवारी सोबत काम करणाऱ्या मजूरांसह त्याने रात्री जेवण केले व झोपून गेले. दरम्यान आज सोमवार १९ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास तिघ्रे शिवारातील शेनफडू पुंडलिक पाटील यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला रूमालाच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. तातडीने त्याला गोदावरील रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. रविंद्र इंधाटे करीत आहे.







