सिल्लोड – :शनिवारी रात्री जवानाने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली असून लग्नाची सुटी संपवून कर्तव्यावर हजर होण्यासाठी जाण्याच्या एक दिवस आधी आत्महत्या केली. रविवारी (दि.9) सकाळी अंधारी येथे आकाश गजानन तायडे (वय २६) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे.
जवान आकाश तायडे नेहमीप्रमाणे त्यांच्या जुन्या घरात रात्री जेवण करुन झोपले होते. सकाळी उशीर होऊनही न उठल्याने आईने घराच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता मुलाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
आईने आरडाओरडा केली व नागरिक जमा झाले. नागरिकांनी तातडीने आकाशला सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले. मृत जवानाचे दीड महिन्यापूर्वीच लग्न झाले होते.