जळगाव ( प्रतिनिधी ) – एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून मृत व्यक्तीने मरणापूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. भागवत शामराव जाधव (वय-४८) रा. गणपती मंदीराजवळ, अयोध्यानगर,असे मयताचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.