जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील सिंधी कॉलनी भागात कापड व्यावसायिकाने कर्जबाजारीमुळे राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीला आली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुरेशकुमार मिठूमल मताना (वय ५० , रा. सिंधी कॉलनी ) असे मयत कापड व्यावसायिकाचे नाव आहे. सुरेशकुमार मताना कुटुंबियासह वास्तव्याला आहेत . फुले मार्केट परिसरात कपडे विकून उदरनिर्वाह करतात. गुरूवारी रात्री कुटुंबियासोबत जेवण करून झोपले. मध्यरात्री त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीला आली. त्यांनी आत्महत्या का केली याबाबत माहिती मिळाली नाही. नातेवाईकांनी मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणला. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी कमला, मुलगा दीपक, सुन हीर, नात यशीका असा परिवार आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. अच्छा यांनी दिलेल्या खबरीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सचिन मुंढे हे करीत आहेत .