जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील मेहरुण शिवारातील मास्टर कॉलनी मिल्लत हायस्कुल जवळील १९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना आज रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. हुजेफा फिरोज खान (वय-१९) असे मयत तरुणाचे आहे.

मिल्लत हायस्कुल जवळील रहिवासी फिरोज खान यांचा चिरंजीव हुजेफा याने राहत्या घरात रात्री साडे आठ वाजेपुर्वी गळफास घेतल्याचे आढळून आले. तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर मुख्य वैद्यकी अधीकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासणी अंती त्यास मृत घोषीत केले. सदर आत्महत्याचे कारण अध्याप कळले नाही आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.







