जळगाव (प्रतिनिधी ) ;- गेल्या अनेक दिवसांपासून तणावाखाली असल्याने २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ जुलै रोजी धरणगाव तालुक्यातील पोकरी तांडा ता. धरणगाव येथे घडली असून यामुळे परिसरात खलबल उडाली आहे. विजय विश्राम चव्हाण वय 21 असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई – वडील 2 भाऊ 2 बहिणी असा परिवार असून हा सर्वात लहान होता. तयाने मानसिक तणावाखाली आत्महत्या केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चौपदरीकरणाच्या कामाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.