जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कानळदा येथील एकाशेतात झोपडीमध्ये ७२ वर्षीय वृध्दाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दिसून आली आहे. तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शामराम दौलत पवार (रा.कानळदा, ता.जळगाव) असे मृत वृध्दाचे नाव आहे. शामराव पवार यांचे गावाबाहेर गिरणा नदीकाठाजवळ शेत आहे. गुरूवारी दुपारी ते शेतात गेले होते. त्यावेळी त्यांनी तेथील झोपडीमध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. काही गुरे चारणा-या मुलांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी कानळदा ग्रामस्थांना सांगितली. त्यानंतर तालुका पोलिस ठाण्यातील लिलाधर महाजन व ज्ञानेश्वर कोळी यांनी घटनास्थळ गाठून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात नेला.
याठिकाणी वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती पवार यांना मृत घोषित केले. त्यानंतर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण समजून आलेले नसून प्राथमिक तपास लिलाधर महाजन करीत आहेत. शुक्रवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.