मुंबई (वृत्तसंस्था );- आरोग्य मंत्रालयाने अजून एक पाऊल पुढे टाकले असून 2,226 पदांच्या निर्मितीसाठी शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यातील एकूण 118 आरोग्य संस्थांकरीता 812 नियमित पदे निर्माण करण्यास तसेच 1184 कुशल मनुष्यबळ सेवा, 226 अकुशल मनुष्यबळ सेवा अशी एकूण 2,226 पदे उपलब्ध करुन घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या या आदेशात असं सांगण्यात आलं आहे की, या 2,226 पदांपैकी काही पदे नियमित, तर काही कंत्राटी पद्धतीने निर्माण करण्यात आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, ट्रामा केअर युनिट यासाठी ही पदे निर्माण केली आहेत.