जळगाव ( प्रतिनिधी ) – सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल लोहाराचे अर्जुन भोई यांना राजनंदिनी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून खान्देशभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे .

त्यांना हा पुरस्कार रविवारी जळगावात अल्पबचत भवन येथे दिला जाणार आहे. लोहारा परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आजपर्यंत त्यांना राज्याबाहेरही सन्मानित करण्यात आले आहे भिवंडी येथे बाराबलुतेदारांचा महाराष्ट्र समाज भूषण, पुणे येथे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार, पुणे येथे मल्लाव समाज सन्मान, नागपूर येथे समाज मित्र, भोई गौरव सन्मान, नवी दिल्ली येथे समाज साथी, धुळे येथे भोई समाज भूषण, मध्यप्रदेश शिवपुरी येथे समाज साथी अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.







