पारोळा तालुक्यातील विचखेडे येथील घटना
पारोळा (प्रतिनिधी) : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील विचखेडे परिसरात मोटरसायकल स्लीप होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. ४ सप्टेंबर रोजी घडली होती. याबाबत दि. ७ सप्टेंबर रोजी पारोळा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश सुधाकर पाठक हे त्यांची मो.सा.क्र सिके-१९-एए-४६२६ हिचेने धुळे येथुन येत असताना विचखेडा ता. पारोळा गावाजवळ दुचाकीसमोर अचानक कुत्रा आल्याने त्यांनी अर्जंट ब्रेक दाबला. त्यामुळे मोटरसायकल स्लीप होऊन गंभिर जखमी झाल्याने स्वतःचे गंभिर दुखापतीस कारणीभुत झाला म्हणुन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हे.कॉ. सुनील हटकर हे करीत आहेत.