वावडदा ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील थेपडे विद्यालयातील अपघातात निधन झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आज सरकारच्या योजनेतील मदतीचा धनादेश काल सुपूर्द करण्यात आला
म्हसावद येथील स्वा.सै.पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता बारावीत शिकणारा विद्यार्थी योगेश ज्ञानेश्वर वराडे याचे दोन वर्षापूर्वी अपघाती निधन झाले होते . राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत शासनाकडे विद्यालयामार्फत पाठपुरावा व कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर दावा मंजूर होऊन शासनाकडून 75000/- रुपयांचा धनादेश त्याची आई व भाऊ यांना देण्यात आला .
या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सोनार , उपमुख्याध्यापक बच्छाव , पर्यवेक्षक भंगाळे , ज्यू.कॉलेजचे विभागप्रमुख योगराज चिंचोरे , .निलेश पवार , शिक्षक प्रतिनिधी सचिन चव्हाण , कारकून भाऊसाहेब वाघ यांच्या प्रयत्नाने शासनाकडून मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला मदत मिळाल्याने संस्थेचे चेअरमन डॉ. केदार थेपडे यांनी व माजी मुख्खाध्यापक पी.डी.पाटील , उपमुख्याध्यापक खोडपे , ज्यू.कॉलेजचे आणि माध्यमिक विभागातील शिक्षक , शिक्षिका यांच्यासह सर्व विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले.