जामनेर (प्रतिनिधी) :- जामनेर येथे गुरुवारी दि २ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७:३० वाजता जळगाव रस्त्यावर जैन इंटरनॅशनल पॉलीटेक्निक जवळ भीषण अपघात झाला. कॉन्ट्रॅक्टर राजू पाटील यांच्या फार्म हाऊस जवळ उभे असलेले बंद ट्रॅक्टरला पॅजो रिक्षाची जोरदार धडक बसून रिक्षा चालक सुनिल सपकाळे, रा.नेरी हा जागीच ठार झाला आहे. काही प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.
नेरी ता.जामनेर येथील रिक्षाचालक सुनील सपकाळे यांच्या रिक्षामध्ये नेरी येथील रहिवासी प्रभू विधाटे व त्यांच्या कुटुंबातील सदस्य काही जामनेर कडील एका गावात कामानिमित्त गेले होते. त्यानंतर घरी परतताना जामनेर पळासखेडा गुजराचे येथील राजू पाटील कॉन्ट्रॅक्टर यांच्या फार्म हाऊस जवळ दोन ट्रॅक्टर रस्त्यावर उभे होती. त्यात संध्याकाळची वेळ असताना पाऊस चालू होता.
यावेळी जामनेर कडून सुनील सपकाळे हे आपली पॅजो रिक्षा घेऊन जात असताना त्यांच्या पुढे एक आयशर गाडी चालत होती. या आयशरला ओव्हरटेक करत असताना त्यांना समोरील रस्त्याच्या कडेला उभे असलेले बंद ट्रॅक्टर दिसले नाही. परिणामी पॅजो रिक्षा ही ट्रॅक्टर ला जोरदार धडकली. पॅजो रिक्क्षा लांब फेकल्या गेली. यात सुनील सपकाळे ह्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर प्रभू विधाटे यांचे कुटुंबीय गंभीर जखमी झाले असून त्यांना जळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे, अशी माहिती मिळाली आहे. जामनेर पोलीस घटनेची नोंद केली आहे.