यावल-चोपडा रस्त्यावरील घटना
चोपडा (प्रतिनिधी) : सातपुड्यात वसलेल्या मनुदेवीचे दर्शन घेण्यासाठी व भंडारा देण्यासाठी भाविकांवर काळाने घाला घातला. यावल- चोपडा रस्त्यावर कारचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात धुळे जिल्ह्यातील निजामपूर येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर कारचालक गंभीर जखमी असून चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धुळ्याच्या साक्री तालुक्यातील निजामपूर येथील वाणी कुटुंब हे यावल तालुक्यातील सातपुडा निवासिनी मनुदेवी याठिकाणी नवरात्रीमध्ये दरवर्षी भंडारा देत असतात. त्यानुसार नवरात्री सुरु असल्याने ठरल्याप्रमाणे मंगळवारी ८ ऑक्टोंबर ला सकाळी वाणी कुटुंबातील शैलेश श्रीधर वाणी (वय ३४), निलेश श्रीधर वाणी (३०) हे दोन भाऊ आणि त्यांच्या सोबत जितेंद्र मुरलीधर भोकरे (वय ४७) हे कारने मनुदेवी येथे भंडारा देण्यासाठी सकाळी मार्गस्थ झाले होते. (केसीएन)मात्र मनुदेवी मंदिर काही किलोमीटर अंतरावर असतानाच त्यांच्या कारचा अपघात झाला.
या भीषण अपघातात वाणी बंधूसह जितेंद्र भोकरे हे तिघे जागीच मृत्युमुखी पडले तर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी देण्यात आले आहे. (केसीएन)घडण्याची माहिती मिळतात यावल पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.