१५ तरुण किरकोळ जखमी ; यावल तालुक्यातील घटना
यावल (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील सातपुडा निवासिनी श्री क्षेत्र मनुदेवी मंदिरातून विठ्ठल नगर, जळगाव येथील दुर्गोत्सव मंडळाचे तरुण ज्योत घेऊन जात असतांना त्यांच्या सोबत असलेले ट्रॅक्टर चिंचोलीपासून काही अंतरावर डोणगाव रस्त्याच्या वळणावर पलटी झाले. वाहनात बसलेले सर्व १५ तरूण सुदैवाने बचावले व दुर फेकले गेले व सर्व तरुण सुरक्षित बाहेर निघाले. त्यांना किरकोळ मार लागला असून जळगाव येथे उपचारासाठी तर काहींना घरी रवाना करण्यात आले.
घटनास्थळी चिंचोली येथील शेतकरी दिनेश सपकाळे, डोणगाव पोलीस पाटील उमेश पाटील, मनुदेवी संस्थेचे विश्वस्त नितीन पाटील यांनी धाव घेत मदत केली. सर्व तरुणांना जळगावी रवाना करण्यात आले.