बुलढाणा तालुक्यातील पोखरी फाट्याजवळची घटना
बुलढाणा (प्रतिनिधी) : शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पोखरी गावाच्या फाट्याजवळच दुपारी ५ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. दुचाकीला भरधाव आयशर वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला असून बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन घटनेची नोंद करीत आहे.
फुलांचा माल घेऊन जाणाऱ्या आयशर गाडीने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. दुचाकीवरील घरी भादोल्याच्या दिशेने जात होते. घटनेत दुचाकीवरील पती, पत्नी व सून यांचा मृत्यू झाला आहे. परंतू चालक आयशरसह क्षणार्धातच फरार झाला. या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. शेख फिरदोस शेख नईम, हमिदाबी शेख नईम अशी मयत पती पत्नीचे नावे आहेत. तर त्यांची सून शेख नईम शेख मुन्नी यांचा उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला आहे. एका कुटुंबातील एकूण चार जणांचा या अपघातात समावेश आहे. चिमुकला बचावला असून उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले होते.