अपघातात ११ जण जखमी ; पहूर जामनेर रस्त्यावरील घटना
जामनेर (प्रतिनिधी ) ;-चालकाचे नियंत्रण सुटल्याने क्रुझर रस्त्याच्या कडेला कोसळून झालेल्या अपघातामध्ये १२ जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील पहुर जामनेर रस्त्यावर घडली .
आज सकाळी ९ : १५ वाजेच्या सुमारास पहुर – जामनेर रस्त्यावर पहुर पासून अंदाजे चार किलोमीटर अंतरावर क्रूजर गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाल्याने यात ११ जण जखमी झाले आहे.
जखमींची नावे पुढील प्रमाणे …..
रफिक बेग इकबाल, वय – ५६, शेख शोयब शेख शकील, वय – १८, फायझाबानो शेख फारूख, वय – १६ , आलीयासूफी शेख फारुख, वय – १२,हिना ,कौसर शेख शकील, वय – १४,शाहरुख बेग शफीक, वय – २३,वसीम अहमद रियाज अहमद, वय – ३२, अकबरीबी रफिक बेग, वय – ४०, तबसू बानो वसीम,अहमद, वय – २४, सय्यद इक्राम सय्यद उस्मान, वय – २२ , शेख जिनत शेख फारुख, वय – २२ सर्व राहणार बरामपूर सर्व जखमी झाले असून यांच्यावर पहुर प्राथमिक ग्रामिण रुग्णालयात उपचार करुन यातील दोन जणांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम यांनी दिली. अपघातस्थळी पहुर येथील जिल्हा परिषद माजी कृषी सभापती प्रदीप भाऊ लोढा व ग्रामस्थांनी मदत केली.