चाळीसगाव शहरातील रेल्वे उड्डाणपूलाजवळची घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहरातील धुळेरोडवरील उड्डाण पुलावर रविवारी रात्री १० वाजेच्या दरम्यान एकाचवेळी दोन दुचाकी आणि एक कार, असा तीन वाहनांचा जबर अपघात घडला. यात एका दुचाकीचे दोन तुकडेच झाले. यात तीन ते चार जण जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
कार नाशिक येथील असल्याचे समजते. या अपघाताबाबत शहर पोलिसांत सोमवारी रात्री उशिरापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले. हा रेल्वे उड्डाणपूल ब्रिटिशकालीन असून, त्यावरून रात्रंदिवस लहानमोठी वाहने धावत असतात. अनेकदा लहान मोठे अपघात होत असतात. जखमींवर रुग्णालय उपचार करण्यात आले आहे.