अनेकदा फॅशनच्या नावाखाली चुकीचे बूट, सँडल्स वापरण्याचे प्रकार केले जातात. तेव्हा आठवड्यातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अनवाणी पायांनी थाेडा वेळ चाललं पाहिजे.यामुळे तुमचं आराेग्य चांगलं राहतं, शक्यताेवर सांध्ये दुखत नाहीत. यामुळे शरीर आणि मन प्रसन्न राहतं.अनवाणी चालण्यामुळे तुम्ही स्वत:ला तरुण बनवू शकाल. यामुळे तुमची एकाग्रता वाढते आणि तुम्ही एखाद्या गाेष्टीकडे जास्त लक्ष केंद्रित करून ते काम करू शकता. या क्रियेमुळे तुमच्या पायांच्या पेशींना आणि स्नायूंना व्यायाम हाेताे शिवाय प्रतिकारशकती वाढणे, वेदना कमी हाेणे आणि टेन्शन कमी हाेणे यांसारख्या समस्यापासून तुमची सुटका हाेऊ शकते.
आपण आज घराबाहेर कुठेही अनवाणी पायाने चालत जात नाही. एवढंच काय, आज घरातही घालायलाही सर्व जण चपला वापरतात. त्यामुळे आपले पाय आणि तळवे स्वच्छ राहत असले तरी त्यामुळे पायाच्या स्नायूंना आणि पेशींना कुठलाच व्यायाम मिळत नाही. सकाळी सकाळी गवतावर जर तुम्ही काही वेळ अनवाणी पायांनी चाललात तर नक्कीच त्याचा फायदा हाेताे. आपल्या पायांच्या पेशींना त्यामुळे व्यायाम मिळताे.आपल्या सर्व शरीरभर असे काही पाॅईंट्स असतात की ज्यामुळे आपलं शरीर ताजंतवानं हाेतं.आणि राेजची कामे करण्यास उत्साह निर्माण हाेताे. अनेक तरुण मुली उंच टाचांच्या चप्पल्स किंवा शूज वापरतात. त्यामुळे पाय आणि टाचांना म्हणावा तसा काही आराम मिळत नाही.