जामनेर ( प्रतिनिधी ) — वाकोद येथील व्यापारी सुभाषचंद लोढा यांची सुन व पत्रकार अर्पण लोढा यांची पत्नी आरती अर्पण लोढा यांनी वयाच्या ३३ व्या वर्षी जैन समाजातील महत्त्वपूर्ण तपस्या करीत केलेल्या ११ उपवासाची पचकावनी मंगळवारी नवीन महावीर भवन , गणेश नगर , जामनेर येथे अनुप्रेक्षाजी म. सा. आदी ठाणा तीन यांच्या सानिध्यात पार पडली.
बुधवारी त्यांनी ११ उपवास पूर्ण केले. या उपवास काळात निरंकार पूर्णतः अन्नत्याग करून ही तपश्यर्या केली जाते जैन समाजात याला फार महत्त्व आहे
महासती अनुप्रेक्षाजी म. सा. मूळ जामनेरच्या असून बन्सीलाल कोठारी व सौ. हीराबाई कोठारी यांची सुपुत्री आहेत २५ वर्षा पूर्वी दिक्षा घेतलेल्या सुपुत्री आज महासतीजीच्या रूपात जामनेरवासीयांना धर्माची शिकवण देत आहेत जन्मभूमीत चातुर्मास करण्याची संधी लाभल्याने आनंद द्विगुणित झाल्याचे म. सा. यांनी सांगितले
या उपवासात फक्त उकळून घेतलेले पाणी सूर्यास्त पूर्वी पिण्याची मुभा असते या उपवासात कोणत्याही प्रकारचे अन्न किंवा फळ, फंळाचा ज्यूस देखील त्याग केला जातो याला तिविहार ( फक्त पाणी पिण्या शिवाय कोणतेही अन्न पदार्थ न खाता केलेले तप) उपवास असे म्हणतात. उपवासाच्या पहिल्या रात्री पासुनच जेवणाचा पूर्ण पणे त्याग सुरु ठेवून जो पुढच्या पूर्ण दिवसभर आणि रात्र भर सुरू असतो.