.जळगाव (प्रतिनिधी) : शहरात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉ. अनुज पाटील यांनी व्यापारी वर्गाच्या भेटीगाठी घेत, त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला.केळकर मार्केट, महात्मा गांधी मार्केट, बळीराम पेठ आणि रेल्वे स्टेशन परिसरातील व्यापार्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपली भूमिका मांडली.
डॉ. अनुज पाटील यांच्या या दौऱ्यात व्यापारी वर्गाने त्यांचे जंगी स्वागत केले. ठिकठिकाणी व्यापाऱ्यांनी लाडू आणि पेढे भरून त्यांचे स्वागत करत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
डॉ. पाटील यांनी या भेटीत व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. शहरातील व्यापार वाढावा, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळावे, आणि व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या उमेदवारीच्या प्रवासात व्यापारी वर्गाने त्यांना पाठिंबा दिल्याने जळगावच्या राजकारणात एक नवा जोश आणि नवचैतन्य संचारले आहे.
जळगाव शहरातील व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी असलेल्या काही प्रमुख व्यक्तींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार, डॉ. अनुज पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी व्यापाऱ्यांच्या हितांसाठी काही महत्त्वाच्या मागण्या आणि प्रश्नांची चर्चा केली.