• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नाटिकेतुन सादर केला ‘आजादी का अमृत महोत्सव’

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 11, 2022
in Uncategorized
0

अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात

जळगाव (प्रतिनिधी ) – भारतीय संस्कृती ही तर्कसंगत बांधिलकीच्या तीन स्तंभांवर उभी आहे, या भारतीय संस्कृतीत परंपरेसह भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि स्वातंत्र्यानंतरची 75 वर्षाच्या प्रगतीची उजळणी करणाऱ्या ‘आजादी का अमृत महोत्सव’ ही नाटिका अनुभूती स्कूलच्या 200 विद्यार्थ्यांनी सादर केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेला प्रत्येक क्षण उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना रोमांचकारीचा अनूभव दिला.

अनुभूती निवासी स्कूलचा आजादी का अमृत महोत्सव या थीमवर आधारित ‘फाउंडर्स डे’ हा अनुभूती स्कूल चे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या स्मृतींना समर्पित असतो तो मोठ्या उत्साहात साजरा झाला. दीपप्रज्वनाने सांस्कृतिक कार्यक्रमासह नाटिकेला सुरवात झाली. अनुभूतीच्या ॲम्पी थिएटर मध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ज्ञानपीठ विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, संघपती दलिचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सुभाष चौधरी, गिमी फरहाद, अनुभूती स्कूलचे चेअरमन अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, सौ. ज्योती जैन, सौ. शोभना जैन, भावना जैन, प्राचार्य देबासिस दास यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत 12 वी मध्ये भारतातुन तृतीय रँक प्राप्त करणाऱ्या कु. रूतिका अरूण देवडा, आत्मन अशोक जैन यांचा तर दहावीत प्रथम आलेल्या कु. देबर्णा दास, दक्ष जतिन हरिया यांचा गौरव करण्यात आला. ‘अंकुरानुभूति’ व ‘संदेशानुभूति’ नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले. शिक्षक अरूण गोपाल यांनी गणिताचे सादरीकरण केले. सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना कला विभागातील यशस्वी, आदित्य, सार्थक हे विद्यार्थी सचित्र पेटिंग करीत होते.

आरंभी ‘द फ्युजन बी’ सादर झाले. यातुन देशभक्तीचा जागर झाला. त्यानंतर भरतनाट्यम्, भांगडा नृत्य यासह भारतीय संस्कृतीमधील नृत्यांची झलक विद्यार्थ्यांनी सादर केली. योग आणि संगीत यांचे उत्तम सादरीकरण केले.’आजादी का अमृत महोत्सव’ नाटिकेचे लिखाण ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी केले. नाटिकमध्ये भारतीय परंपरा, इतिहासासह स्वांतत्र्यानंतरच्या 75 वर्षातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा, संविधानाची निर्मिती, संस्थानांचे विलीनीकरण, हरित क्रांती, धवल क्रांती, ठिबक सिंचनात श्रध्देय भवरलाल जैन यांनी घडवून आणलेली क्रांती, संशोधनात्मक प्रयत्नातून शेतकऱ्यांच्या जीवनात झालेले सकारात्मक बदल विद्यार्थ्यांनी नाटिकेतून सादर केले. देशातील उद्योग विश्वातील भरारी, अवकाश संशोधनात भारताचे यश तर कोव्हिड सारख्या आपत्तींत भारतीयांचे वॅक्सीन संदर्भातील संशोधन पर्यंतचा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांनी उलगडला. सुत्रसंचालन राधिका सोनी, अंजली अग्रवाल, अनुष्का महाजन, सिध्देश मल्लावार यांनी केले.

अन्नदाता सुखी तर आपण सुखी – कुलगुरू विजय माहेश्वरी

भवरलालजी जैन यांच्याकडे दुरदृष्टी होती. ते व्हिजनरी होते. त्यातूनच त्यांनी अन्नदाता सुखी तर आपण सुखी यासाठी जैन इरिगेशनच्या माध्यमातून अहोरात्र प्रयत्न केले. चांगल्या दर्जाचे शिक्षण, अनुभव, इंटिर्गेड लर्निंग या दृष्टीने अनुभूती स्कूलची निर्मिती केली. यश प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न मनापासून केले पाहिजे. व्यक्तीमत्व बदलविणारे शिक्षण पाहिजे, लढणे आणि जिंकणे यातील फरक शिकविणारे शिक्षण अनुभूती स्कूलमध्ये भवरलालजी जैन यांनी उपलब्ध करून दिले.


 

 

Tags: #anubhuti english midium school #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जळगाव जिल्हा दुध संघासाठी मतदानास सुरुवात

Next Post

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे 13 डिसेंबरला साहित्य कला पुरस्कार वितरण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे 13 डिसेंबरला साहित्य कला पुरस्कार वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon