आपल्या सुमधुर आवाजाने अण्णांनी केले मंत्रमुग्ध
जळगाव (विशेष प्रतिनिधी) – जळगाव येथील गोलाणी मार्केटमधील केसरीराज कार्यालयास खान्देशचे युवा लोक कलावंत पुरस्कार प्राप्त व आपल्या सुरेल आवाजाने देशभर सुप्रसिध्द गाणे केसावर फुगे फेम अण्णा सुरवाडे यांनी आज दि.2 रोजी सदिच्छा भेट दिली.
कार्यालयास भेटप्रसंगी अण्णांनी आपल्या सुमधुर आवाजाने देवा काळजी.., जिंदगी नाम दोस्ती,दोस्ती का नाम जिंदगी, कच्चे धागे से.. तेरे बिन नही जिना..यासह विविध गाणे सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी केसरीराजचे संपादक भगवान सोनार, कार्यकारी संपादक नरेश बागडे, संगणक प्रमुख उमेश देशपांडे, जामनेरचे सनलाईट फिल्म प्रोजेक्टचे निलेश सपकाळ, डायरेक्टर सुरेश राजपूत, रविंद्र चौधरी, शुभम सोनार,रवि कंडारे, आदि उपस्थित होते.







