मुक्ताईनगरातील सेविका कर्मचारी होणार सहभागी
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- अंगणवाडी सेविकांच्या राज्यव्यापी बेमुदत संप ४ डिसेंबरपासून सुरु होत आहे. संपात मुक्ताईनगर येथील अंगणवाडी सेविका कर्मचारी सहभागी होणार आहेत. याबाबत त्यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी यांना संपाचे निवेदन दिले आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पात कामे करणाऱ्या कर्मचार्यांना शासकीय कर्मचा-यांचा दर्जा देण्यात येऊन, अंगणवाडी सेविकांना- तृतीय श्रेणी व मदतनीसांना चतुर्थश्रेणी लागु करण्यात यावी,अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरघोस वाढ करा, दरमहा पेंशन योजना सुरू करा, सर्व मिनी अंगणवाडी केंद्राचे रुपांतरण मोठ्या अंगणवाडी केंद्रात करावी या व इतर मागण्या पूर्ण .होईपर्यंत, दिनांक ४ डिसेंबर पासून अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत.
अंगणवाडी सेविकांनी नोव्हेंबर महिन्याचे मासिक अहवाल वर बहिष्कार टाकण्यांत आला असून तसे निवेदन संघटनेचे सचिव भानुदास पाटील यांनी दिले. त्यावेळी अंगणवाडी सेविका ज्योती बोराखेडे, निता दाते, सुवर्णा सोनवणे,आशा झाल्टे, वर्षा मुळतकर,सविता इंगळे, रेखा कापडे, शिला इंगळे, दुर्गा आगरकर, लक्ष्मी वानखेडे, मंदा चिंचोलकर ,धिरोष्णा कासार, उज्वला चौधरी, कविता पवार, ताई पाटील आदी अंगणवाडी कर्मचारी महिला उपस्थित होत्या.