राष्ट्रवादीतर्फे अनोखी गांधीगिरी ; समस्यां मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
जळगाव (प्रतिनिधी ) – खोटे नगर ते बेंडाळे स्टॉप उड्डाणपूल खाली असलेल्या दादावाडी स्टॉप नजीकच्या अंडरपासला लागून असलेला सर्विस रोड बांधून सहा महिने देखील उलटे नाही, तोवर रस्त्याची बिकट दुर्दशा झाली आहे. त्या ठिकाणी भले मोठे दोनखड्डे पडलेले आहेत असून नागरिकांची वाहतुकीसाठीधावपळ होत आहे. एवढेच नाही तर त्या खड्ड्यात पडून कोणाचा जीव देखील जाऊ शकतो असे म्हटले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी संतापून या खड्ड्याला प्रथम क्रमांकाचे खड्डे म्हणून बक्षीस दिले आहे.
परिसरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रार करून देखील या खड्ड्यांची दखल घेण्यात आली नाही कुणीतरी दखल घ्यावी असा प्रश्न थेट कुंदन सूर्यवंशी यांनी प्रसारमाध्यमांतून लोकप्रतिनिधींना केला.
समस्येकडे सगळ्यांचे लक्ष वेधले जावे म्हणून परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर उपाध्यक्ष कुंदन सूर्यवंशी यांनी ॲडव्होकेट कुणाल पवार यांच्या संकल्पनेतून एक प्रतियोगितेचे आयोजन केले, जळगाव मधील जो सर्वात मोठा खड्डा असेल त्याला नंबर एकचे खड्डा रत्न पारितोषिक देण्यात येईल व त्यामध्ये दादावाडी स्टॉप चा खड्डा हा नंबर एकचा पारितोषिक विजेता ठरला व त्याला खड्डारत्न पारितोषिक क्रमांक एक घोषित करण्यात आला. आणि लवकरात लवकर यावर उपाय योजना न केल्यास, आम्ही परिसरातील सर्व नागरिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला आहे.