जळगाव ( प्रतिनिधी ) – आमचे काम बंद आंदोलन शांततेत सुरु राहील , कुणालाही कोणताच त्रास हीनार नाही अशी ग्वाही आज जळगावात आंदोलन करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांनी विभागीय व्यवस्थापक आणि पोलिसांना दिली.
जळगाव एस टी बस स्टॅन्ड व बस डेपो येथील कर्मचारी यांनी काल दुपारपासून एस टी महामंडळास शासनामध्ये समाविष्ठ करून घेणे व इतर मागण्या संदर्भात कामबंद आंदोलन चालू केल्यामुळे तेथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे एस टी चे विभागीय व्यवस्थापक भगवान जगणोर, आगार व्यवस्थापक निलेश पाटील, कर्मचारी यांचे पदाधिकारी व 200 ते 250 कर्मचारी यांची आंदोलनस्थळी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आम्ही शांततेचा भंग होणार नाही व कायद्यांचे चौकटीतच राहूनच आंदोलन सुरु ठेऊत असे कर्मचाऱ्यांनी सांगितले एस टी विभागाचे कोणाकडूनही कोणतेही नुकसान होणार नाही याची प्रत्येकांनी काळजी घ्यावी अन्यथा सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला असता उपस्थित कर्मचारी यांनी आमचे आंदोलन शांततेत राहील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची ग्वाही दिली आहे.