जळगाव ( प्रतिनिधी ) – अनैतिक संबंधांच्या संशयातून सावखेड्यात सालदाराचा खून करण्यात आल्याची घटना काल रात्री घडली.

सावखेड्याचे पोलीस पाटील चंद्रकांत सोनवणे यांनी तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , सावखेड्यातील उत्तम चौधरी या शेतकऱ्याकडे भैया मदन भिलाला पवार ( रा – मडगाव , ता – खरगोण , जि – सेंधवा , मध्य प्रदेश ) हा वर्षभरापासून सालदार म्हणून काम करतोय. याच गावात कुटुंबासह राहणारा शांताराम सोनवणे शेतमजुरी करतो. महिनाभरापासून आलेला त्याचा धाकटा भाऊ श्रावण सोनवणे (वय ४०) हाही शेतमजुरी करत होता. श्रावण सोनवणे अविवाहित होता काल रात्री उत्तम चौधरी यांचा मुलगा सुजित पोलीस पाटील चंद्रकांत सोनवणे यांच्या घरी त्यांना बोलवायला आला आणि उत्तम चौधरी यांच्या घरी घेऊन गेला त्यावेळी तेथे भैया भिलाला उभा होता , त्याच्या कपड्यावर पडलेले रक्ताचे डाग पाहून त्याला विचारणा केल्यावर त्याने सांगितले की , श्रावण सोनवणे याचे माझ्या पत्नीशी अनैतिक संबंध होते आधी दोन वेळा मी त्याला माझ्या पत्नीसोबत पाहिले होते, त्यामुळे मी संतापात होतो त्यामुळे आज मी त्याला दारू पाजून काळ भैरव मंदिराजवळ नेले आणि तेथे त्याच्या डोक्यात वार करून त्याची हत्या केली आहे त्यानंतर आम्ही काळ भैरव मंदिराजवळ गेल्यावर तेथे आम्हाला श्रावण सोनवणे मृतावस्थेत दिसला कोणत्या हत्याराने श्रावण सोनवणे याला मारले याची माहिती मात्र त्यावेळी भिलाला याने पोलीस पाटलांना दिली नाही
सावखेड्याचे पोलीस पाटील चंद्रकांत सोनवणे यांनी तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी गेले आणि पुढील कारवाई केली पोलीस पाटील चंद्रकांत सोनवणे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपी भैया भिलाला विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गु र न २७४/२०२१ भा द वि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत असून घटनास्थळी सहायक पोलीस उपअधीक्षक कुमार चिंता यांच्यासह पोलिसांचा ताफा दाखल झाला श्रावण सोनवनेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.







