जळगाव (प्रतिनिधी) : हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर पैसे मागितल्याचा राग आल्याने दोघांनी हॉटेल मालकाला जबर मारहाण केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील येथील शेख इमाम शेख युनूस (रा. शिरसौली प्र.बो.) यांचे हॉटेल आहे. त्याठिकाणी दि. ८ जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास गावातील राहुल पाटील, अजय भिल व त्याचा मित्र जेवणासाठी आले होते. त्यांनी जेवण केैल्यानंतर पैसे न देता हॉटेलमधून जात होते. यावेळी शेख इमाम याने त्या तरुणांना जेवणाचे पैसे मागितले असता, त्या तिघांनी शेख इमाम यांच्या चिकनच्या दुकानाजवळ येवून मारहाण केली.
तसेच त्याच्या दुकानातील साहित्याची तोडफोड करीत नुकसान केले. दरम्यान, शेख इमाम याने लागलीच एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ समाधान टाहकळे हे करीत आहे.