पारोळा (प्रतिनिधी) एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांनी भडगाव तालुक्यातील तळबंद तांडा, भातखंडे, गिरड आदी गावांमध्ये प्रचार रॅली घेऊन मायबाप जनतेचे आशीर्वाद घेतले.
अमोल चिमणराव पाटील यांना गावोगावी आता मोठा प्रतिसाद लाभत आहे. महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने ग्रामस्थांपर्यंत पोहोचून अमोल चिमणराव पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत.
शुक्रवारी अमोल चिमणराव पाटील यांनी भडगाव तालुक्यातील तळबंद तांडा, पिंपळगाव बुद्रुक, बांबरुड, भट्टगाव, मांडकी, भातखंडे बुद्रुक, गिरड अशा विविध गावात जाऊन मायबाप जनतेच्या गाठीभेटी घेत शुभाशीर्वाद घेतले. यावेळी जनतेने त्यांना भरभरून प्रतिसाद दिला असून अमोल पाटील यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली आहे.