पाचोरा ( प्रतिनिधी ) – भाजपा पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या १५ नोव्हेंबररोजीच्या वाढदिवसानिमित्त भाजपा अध्यात्मिक आघाडीच्यावतीने पाचोरा व भडगाव तालुक्यांत लोकाभिमुख उपक्रम आणि किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कालपासून सुरु झालेला हा सप्ताह आठवडाभर चालणार आहे
किर्तन सप्ताहाचे गावनिहाय नियोजन असे आहे – काल नगरदेवळा येथे ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचे कीर्तन झाले . आज भडगाव तालुक्यातील
गोंडगांव येथे ह.भ.प.प्रकाश महाराज साठे ( धारूर , बीड ) यांचे कीर्तन होणार आहे . गुरुवारी कुरंगी येथे ह.भ.प.कन्हैया महाराज राजपूत ( राहेरे ) यांचे , शुक्रवारी खडकदेवळा येथे ह.भ.प.गोविंद महाराज गोरे ( आळंदी ) यांचे व वाडे येथे ह.भ.प.तुकाराम महाराज मुंडे शास्त्री ( परळी ) यांचे , शनिवारी गुढे येथे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचे कीर्तन होणार आहे
पाचोरा व भडगाव तालुक्यातील नागरिकांनी तसेच भजनी मंडळ, वारकरी सांप्रदाय आणि किर्तनप्रेमींनी किर्तन सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आव्हान संयोजकांनी केले आहे.







