‘मविआ’चे धनंजय चौधरी ४३ हजार ५६२ मतांनी पराभूत
रावेर (विशेष प्रतिनिधी) :- येथील रावेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार तथा भाजपचे जिल्हाप्रमुख अमोल हरिभाऊ जावळे यांचा विजय झाला असून महाविकास आघाडीचे धनंजय चौधरी यांचा ४३ हजार ५६२ मतांनी पराभव केला आहे. आता माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे नेतृत्व अमोल जावळे करणार असून पित्याचा विकासाचा वारसा पुढे नेतील.
आता सर्व २४ फेऱ्या संपलेल्या आहे. अमोल जावळे यांना २४ व्या फेरीअखेर १ लाख १३ हजार ६७६ तर धनंजय चौधरी यांना ७० हजार ११४ मते मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर प्रहार जनशक्ती पक्षाचे अनिल चौधरी यांनी २५ हजार १७० मते मिळवून लक्ष वेधून घेतले आहे. रावेर तालुक्यातील विविध गावागावांत महायुतीकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे शमीभा पाटील यांना ८४५३ तर अपक्ष दारा मोहम्मद यांना ९८१४ मते मिळाली आहे.