अमळनेर शहरातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील जिनगर गल्ली मशीद जवळ असलेल्या राज फुटवेअरच्या संचालकाच्या घरी चोरट्यांनी चोरी केली. दागिने व रोकड लांबवले. शनिवारी संध्याकाळी चोरीची घटना घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज फुटवेअरचे संचालक जुजर फजलेहुसेन बोहरी यांचे जिनगर गल्ली मशीद जवळ घर आहे. चोरट्यांनी शनिवारी संध्याकाळी ६ नंतर घर फोडून चोरी केली. यात ४० ग्रॅम सोन्याचे दागिने २५ हजार रोकड आणि चांदीचे दागिने चोरून नेले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विकास देवरे यांच्यासह निलेश मोरे, शिरसाठ देशमाने, विनोद संदानशिव, मिलिंद सोनार, कोठावदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.