अमळनेर ( प्रतिनिधी ) – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी आंदोलनात नरसंहार करणाऱ्या भाजप व योगी सरकारच्या निषेधार्थ अमळनेर मतदारसंघाच्या वतीने महाविकस आघाडीकडून आज बंदचे आवाहन करून आरोपींना कठोर शासन व्हावे, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. अमळनेर शहरातुन महाविकास आघाडीने पुकारलेल्या या महाराष्ट्र बंदच्या हाकेला संपूर्ण तालुक्यातुन संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसून आला. मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.







