अमळनेर ( प्रतिनिधी ) – येथील धुळे रस्त्यावरील भारत गॅस गोडाऊनच्या मागील बाजूला सर्वत्र नगर येथे अँड. किशोर बागुल यांच्या राहत्या घरी आज सकाळी सुमारे तीन लाख ८५ हजार २०० रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली.
अँड.किशोर बागुल हे आज सकाळी ठीक १० वाजता त्यांच्या पत्नी सोबत ग्लोबल इंग्लिश स्कुल येथे त्यांच्या मुलाचा निकाल पाहण्याकरिता गेले होते. त्यानंतर ते ठीक ११ वाजेच्या सुमारास घरी आले असता त्यांना बेडरूम मधील कपाटातील काही सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला. त्यामुळे घरात काही तरी घडले असल्याची कल्पना आल्याने मागील बाजूस जावून पाहिले असता घरातील मागील बाजूस असलेला दरवाजेच्या कडी – कोंडा तुटलेला दिसला. तेव्हा चोरी झाल्याचे समजले असता यावेळी घरातील सुमारे ७५ ग्रॅम वजनाचे सोने,१०,२००(दहा हजार दोनशे रुपये रोख )असे एकूण ३,८५,२०० (तीन लाख पंच्याशी हजार दोनशे रुपयांची )चोरी झाल्याचे समजले.
यात २,३५००० (दोन लाख पस्तीस हजार )किंमतीची एक सोन्याची ४७ ग्रॅम वजनाची मंगलपोत, ८०,००० (ऐंशी हजार ) किंमतीची एक सोन्याची १६ ग्रॅम वजनाची लहान पोत, ६०,००० (साठ हजार )किंमतीची एक सोन्याची १२ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स ,१०,२०० रुपये रोख त्यात ५००,१०० दराच्या भारतीय चलनी नोटा असा एकूण ३,८५,२०० रुपयांची चोरी झाल्याची नोंद अमळनेर पोलीस स्टेशनला अँड. किशोर बागुल यांच्या खबरीवरून देण्यात आली आहे.