गांधली, फापोरे येथील घटना
अमळनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील गांधली व फाफोरे येथे दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.दोन्ही प्रकरणांत अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गांधली येथे १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास विजय आसाराम पाटील (वय ४५) यांनी राहत्या घराच्या बांधकाम सुरू असलेल्या वरच्या मजल्यावर वायरच्या साहाय्याने गळफास घेतला. त्यांच्या पत्नीच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेजारच्यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
दुसऱ्या घटनेत फाफोरे बु येथे लक्ष्मण पंडित शिंदे (वय ४०) यांनी २० रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मयताचे काका आणि ग्रामस्थांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दोन्ही प्रकरणांत अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









