अमळनेर (प्रतिनिधी) – भिम आर्मीच्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी प्रवीण बैसाणे यांची नुकतीच निवड झाली. भुसावळ येथे एका कार्यक्रमाप्रसंगी त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.महाविद्यालयीन काळापासूनच प्रताप महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, तसेच आपल्या कुशल नेतृत्वामुळे तालुक्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे, या कार्यामुळे भिम आर्मीने त्यांना ही जबाबदारी दिली. भिम आर्मीच्या माध्यमातून आम्ही समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी म्हटले आहे.तसेच शहर अध्यक्ष पदी कृष्णकांत शिरसाठ यांची निवळ झाली आहे.
सदर कार्यक्रम प्रसंगी, “भिम आर्मी” महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रफुल्ल शेंडे, राज्य प्रवक्ते रमाकांत तायडे, महा.राज्य सचिव सूपडू संदानशिव , जिल्हा प्रमुख गणेश सपकाळे,जळगांव जिल्हा महासचिव श्रीकांत वानखेडे, जळगांव जिल्हा मुख्य संघटक विक्रम प्रधान, जिल्हा संघटक डॉली वानखेडे, जिल्हा सहसंघटक योगेश भालेराव, जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रबुद्ध खरे,भुसावळ तालुका प्रमुख विकास वलकर, यावल तालुका प्रमुख हेमराज तायडे, बोदवड तालुका प्रमुख सनी इंगळे, भडगाव तालुका प्रमुख डॉ.शेख, भुसावळ तालुका कामगार युनिट प्रमुख शकील शेख अमळनेरचे बाळासाहेब सोनावणे, भूपेंद्र शिरसाठ, आत्माराम अहिरे व जळगांव जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








