अमळनेर ;- शहरात कोरोनाच्या पार्शवभूमीवर जनता कर्फ्यू १०० टक्के पाळण्यात आला आहे . कारंजा चौक ते झामि चौक साळीवाडा दगडी दरवाजा गंगाघाट मेन बाजार तसेच बौरी पेट्रोल पप्म बस स्टॅन्ड परीसर जनता कर्फ्यूचा पहीला दिवस नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पल्ला असल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. प्रांताधिकारी सिमा अहीरे , अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील ,पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांनी नागरिकांना कोरोनाबाबत जनजागृती करून घरीच राहण्याचे आवाहन केले होते . त्यानुसार नागरिकांडी जनता कर्फ्यूचा पहिला दिवस यशस्वीपणे पाळला . तसेच यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे नागरिकांनी कौतुक केले.