अमळनेर (प्रतिनिधी ) ;- सेवानिवृत्त जवानाचे बंद घराच्या मागचा दरवाजा उघडून घरातून मोबाईल आणि रोकड असा एकुण ७ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शहरातील प्रताप मिल परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश दंगल पाटील वय ४१ हे आपल्या परिवारासह राहात असून ते सेवानिवृत्त जवान आहेत. मंगळवारी १६ जुलै रोजी पासून त्यांचे घर बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर पाहून घरच्या मागचा दरवाजा उघडून घरातून ५ हजार रूपयांचा मोबाईल आणि २ हजारांची रोकड असा एकुण ७ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना बुधवारी १७ जुलै रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले आहे. त्यानंतर त्यांनी रात्री ९ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकॉ विनोद सोनवणे हे करीत आहे.