मुंबई (वृत्तसंस्था ) – बिग बी अमिताभ बच्चन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर अमिताभ बच्चन यांचे मुंबईतील घर मुंबई महापालिकेने निर्जंतुक केले. अमिताभ बच्चन यांची मंगळवारी 23 ऑगस्ट रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने 24 ऑगस्ट रोजी अमिताभ बच्चन यांचे घर निर्जंतुक केले. बिग बींनी अमिताभ सोशल मीडियावर सर्वांना त्यांना कोविड-19 झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ट्विट करत त्यांच्या संपर्कातील आलेल्या लोकांनी काळजी घ्यावी आणि कोरोना चाचणी करुन घ्यावे, असे आवाहन केले आहे.
अमिताभ यांना सध्या अंगदुखी आणि डोकेदुखीचा त्रास होत आहे आणि लक्षणे गंभीर नाहीत. या अभिनेत्याला सात दिवस क्वारंटाईन करावे लागणार आहे.
मुंबई महापालिकेच्या टीमने अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील घराचे निर्जंतुकीकरण केले. बीएमसी टीमने काल सकाळी अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील घराची स्वच्छता केली.