जळगाव (प्रतिनिधी): – येथील गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलमधील इयत्ता १२ वीचा विद्यार्थी अमेय ललित चौधरी याने जेईई मेन परीक्षेत देशात ३११ वा क्रमांक मिळवून शाळेचे व कुटुंबाचे नाव उज्वल केले आहे.
ही कामगिरी अत्यंत गौरवास्पद असून अमेयच्या अथक परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीचे प्रतीक आहे.देशभरातून लाखो विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेत सहभागी होतात. अशा परीस्थितीत अमेयने मिळवलेली रँक ही निश्चितच उल्लेखनीय आणि इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, गोदावरी फाउंडेशन च्या सचिव डॉ.वर्षा पाटील, गोदावरी फाउंडेशनचे सदस्य डॉ.अनिकेत पाटील,डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, तसेच शाळेच्या प्राचार्या सौ. नीलिमा चौधरी यांनी तसेच शिक्षकवृंद यांनी अमेयचे विशेष अभिनंदन करून त्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या .