नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) ;- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका सरकारने भारताची मदत करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार अमेरिकेतून मदतीची पहिली खेप भारतात दाखल झाली आहे. शुक्रवारी सकाळी अमेरिकेच्या वायुदलाच्या विमानांनी मी मदत भारतापर्यंत पोहोचवण्यात आली.
याच प्रकारे पुढच्या आठवड्यातही असे विमान भारतात दाखल होणार आहेत, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.
यामध्ये ऑक्सिजनशी संबंधित उपकरणं आणि कच्चा माल, पीपीई किट, लसनिर्मितीसाठी आवश्यक वैद्यकीय कच्चा माल, रॅपिड डायग्लोस्टिक टेस्ट तसंच कोरोना चाचणीसाठी आवश्यक असलेल्या उपकरणांचा समावेश असणार आहे.







