जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. पंकज आशिया यांची यवतमाळ जिल्हाधिकारीपदी बदली ; अंकित पन्नू नवीन सीईओ
जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची बदली झाली असून शासनातर्फे तसे आदेश शुक्रवारी २१ जुलै रोजी संध्याकाळी काढण्यात आले आहेत. त्यांच्या जागी जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून आयुष प्रसाद यांची नियुक्ती शासनाने केली आहे. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची देखील यवतमाळच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली असून त्यांच्या जागी अंकित पन्नू यांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान अमन मित्तल यांची बदली कोठे झाली याबाबत आदेशात नमूद नाही. तर आयुष प्रसाद यांना मित्तल यांच्या जागी तातडीने कार्यभार स्वीकारावा असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहे.
दरम्यान गेल्या चार वर्षांपासून यशस्वीपणे कारकीर्द गाजवणारे डॉ. पंकज आशिया या बेधडक अधिकाऱ्यांची देखील यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी तरुण तडफदार अंकित पन्नू हे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथून येत आहेत.