अमळनेर ( प्रतिनिधी ) ;- केंद्र सरकारच्या पेट्रोल व डिझेल व घरगुती गॅस दरवाढीचा जाहीर निषेध म्हणून आज शिवसेना अमळनेर तर्फे रेस्ट हाऊस चौकात आंदोलन करण्यात येऊन मा तहसिलदार यांना निवेदन दिले . शिवसेना अमळनेर पदाधिकारी यांनी केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या किंमती व गॅस दरवाढ रोज भरमसाठ वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिक ईतर जीवनावश्यक वस्तूंची वाढ झाल्याने होरपळून निघाले.
शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाने निद्रानाश झालेल्या सरकारला जागवण्यासाठी शिवसेना राज्यभर आज आंदोलन करीत आहे.रेस्ट हाऊस चौकात रास्तारोको करून तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन देण्यांत आले. जगात सर्वाधिक पेट्रोल चे दर हिंदुस्थानात आहेत व त्यात कोरोना परिस्थितीत जगणे मुश्किल झाले आहे, पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस यांची वाढ त्वरित कमी करून जीवनावश्यक वस्तूंचेही भाव आटोक्यात आणावे म्हणून आज आंदोलनाद्वारे केंद्र सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करीत असल्याचे उपजिल्हाप्रमुख डॉ राजेंद्र पिंगळे यांनी आंदोलना प्रसंगी म्हटले. सदर प्रसंगी खालील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. डॉ राजेंद्र पिंगळे उपजिल्हाप्रमुख विजय पाटीलतालुका प्रमुख संजय पाटील शहर प्रमुखसौ मनिषा परब उपजजिल्हा संघटिका महिला आघाडी सौ संगीता शिंदे महिला तालुका संघटिका,श्रीकांत पाटील युवासेना उपजिल्हाधिकारी,किशोर पाटीलतालुका अधिकारी युवासेनाअमर पाटीलशहर अधिकारी युवा सेनाप्रताप शिंपी नगरसेवक,सुरेश अर्जुन पाटील तालुका अध्यक्ष सरपंच संघटना, डॉ शशिकांत सोनार वैद्यकीय आघाडी,जितू झाबक व विमल बाफना व्यापारी सेना, शहर संघटक चंद्रशेखर भावसार,उपशहरप्रमुख जिवन पवार,मोहन भोई,बोरसे टेलर,वाहतुकसेना रमेश पाटील,टिनू बोरसे,विजय नवल पाटील पैलाड,ज्ञानेश्वर गंगाराम पाटील,सुभाष पाटील,रामचंद्र परब,आकाश पाटील,ईश्वर पाटील,मीराबाई मालुसरे,सुनीता माने,वर्षा परब,सुंनू सोनवणे, कलाबाई पाटील,सुनीताबाई माने,मुरलीधर शिरसाठ,लीलाधर कोळी,शशी परदेशी,जयेश पाटील,प्रल्हाद पाटील,पंकज धनगर,हितेश ठाकरे,गौरव माळी, गोपाळ पाटील,पुषोत्तम पाटील,विवेक पाटील,रावसाहेब पाटील,जितेंद्र दुसाने, सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते







