चाळीसगाव तालुक्यातील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील मूळची राहणारी व सध्या पालघर जिल्ह्यात रहिवासी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला संशयित आरोपी सोमनाथ प्रकाश चव्हाण (वय २१) याने पिडीत मुलीला चाळीसगाव तालुक्यातील गावी घरी जबरदस्ती बोलावून घेतले. तिच्या अल्पवयीन असण्याचा फायदा घेत लैंगिक अत्याचार केला. तिच्यावर अत्याचार केल्याने पिडीत मुलगी ही ३ महिन्याची गरोदर राहिली. कोणास काही सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी तरुणाने मुलीला दिली. हा प्रकार लक्षात आल्यावर नातेवाईकांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून सोमनाथ चव्हाण याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत.