चोपडा तालुक्यातील अडावद येथील घटना, दोघे कोठडीत
जळगाव (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील अडावद येथे नराधमांनी दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. अडावद येथे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पीडित अल्पवयीन मुली आणि संशयित आरोपी एकाच गावातील आहे. या संशयितांनी अल्पवयीन मुलींना फूस लावून मोटरसायकलने पळवून नेत तापी नदीच्या किनारी निर्जनस्थळी नेत त्यांच्यावर अत्याचार केला. या अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्या प्रकरणी दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात एक विधी संघर्षीत १७ वर्षीय बालकाचा समावेश असल्याने त्याची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. तर दुसऱ्या १९ वर्षीय तरुणाला सोमवारपर्यंत ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, दोन्ही पिडीत मुली या अल्पवयीन आहेत. त्यांना आरोपिंनी फूस लावून पळवून नेले होते. याबाबत अडावद पोलीस स्टेशनला त्यांची हरवल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, आता या प्रकरणात अत्याराचा गुन्हा दखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि राजु थोरात, पोहेकॉ संजय धनगर, सतीश भोई हे करीत आहेत.