रावेर ( प्रतिनिधी ) – निंभोरा येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. निंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२१ ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी अल्पवयीन मुलील अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचे उघडकीला आले आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विकास कोल्हे करीत आहे.