जळगाव ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील फैजपूर येथे १४ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपीविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फैजपूर शहरात १४ वर्षीय मुलगी कुटुंबियासह वास्तव्यास आहे. ३० ऑक्टोबररोजी रात्री मुलगी घरात एकटी असतांना अर्जून सिध्दार्थ केदारे (रा. फैजपूर) याने घरात घुसून या मुलीचा जबरदस्ती हात पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले मुलीने कुटुंबियांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेत संशयित तरुणाविरुद्ध तक्रार दिली. पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी अर्जून केदारे याच्याविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो उ नि एम.जे. शेख करीत आहे.