भुसावळ येथील न्यायालयाचा निर्णय
भुसावळच्या एका भागातील अल्पवयीन तरूणीला दिनांक २८ मे २०१५ रोजी फुस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने २९ मे २०१५ ला भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गौतम शिवचरण चौव्हाण याच्याविरूध्द तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने संशयित आरोपी गौतम विरूद्ध बाललैगिंक अत्याचार कायदा कलम (३ अ) व (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पीडित मुलगी ही आई, वडिलांना मिळाल्यानंतर आरोपीने दिलेल्या धमक्यामुळे सुरूवातीला तिने अत्त्याचाराच्या घटनेबद्दल सांगितले नाही.
मात्र, नंतर तिची भिती निघून गेल्यानंतर तिने गौतमने तिला त्याच्या नातेवाईक असलेल्या इतर लोकांकडे वेगवेगळ्या गावी नेवून अत्त्याचार केल्याचे सांगितले. तर इतरांनी ही गौतम यास सहकार्य केल्याचा आरोप होता.(केसीएन)या प्रकरणात गौतम याच्याविरुद्ध भुसावळ येथील विशेष न्यायाधिश डि. एल. गायकवाड यांच्या न्यायालयात या खटल्याचे सरकारतर्फे पीडितेची आई तसेच पीडितेची तपासणी करणाऱ्या डॉ. नम्रता अच्छा तर जन्म नोंदणी अधिकारी व तपासी अधिकारी पीएसआय आशिष शेळके आदींसह ९ लोकांच्या साक्षी तपासण्यात आल्यात.
साक्षी, पुराव्याअंती आरोपी गौतमविरूध्द अत्याचाराचा आरोप सिध्द झाल्याने न्यायालयाने त्यास दोषी धरून ८ रोजी १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. (केसीएन)गौतम यास ठोठावलेल्या शिक्षेत ५ हजार रुपये दंड व दंडापैकी ४ हजार रूपये पीडितेला देण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. तर उर्वरित सहकार्य करणारे आरोपींविरूध्द दोष सिध्द न झाल्याने त्यांना दोषमुक्त करण्यात आले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. विजय खडसे यांनी कामकाज पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून पीएसआय रफिक शेख कालू यांनी सहकार्य केले. या गुन्हयाचा तपास पीएसआय आशिष शेळके यांनी केला होता.