प्रेमसंबंध असल्याचे नवऱ्याला सांगितल्यावर फारकतीनंतर लग्नाला नकार

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील रहिवाशी असलेल्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत सलग १९ महिने अत्याचार करणाऱ्या आरोपीवर आज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे , विशेष म्हणजे आपले या मुलीशी प्रेमसंबंध आहेत अशी माहिती या आरोपीने मुलीच्या पतीला दिल्यावर त्यांचा घटस्फोट झाला होता. फिर्यादी मुलीचा घटस्फोट झाल्यावर या आरोपीने लग्नाला नकार दिला .
जळगाव शहरात फिर्यादी मुलगी कुटुंबासह वास्तव्यास आहे काही वर्षांपूर्वी हे कुटुंब एरंडोलला राहत होते . जळगावात ते ३ वर्षांपासून राहत आहेत . २ वर्षांपूर्वी या मुलीची आरोपी हसन असलम मोमीन ( रा – एरंडोल ) सोबत ओळख झाली . त्याने मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला आणि तिला लग्नाची मागणी घातली . त्यांनंतर माझे आई – वडील लग्नाला तयार नाहीत तरीही मी तुझ्याशीच लग्न करिन पण २ वर्षे वेळ लागेल असे तो सांगत होता असे आश्वासन त्याने फिर्यादी मुलीच्या आई- वडिलांनाही दिले होते . दरम्यानच्या काळात मुलीच्या आई वडिलांनी तिचे लग्न सुरत येथील मुलाशी करून टाकले . मात्र ती अल्पवयीन असल्याने काही काळ आई वडिलांकडे राहील यासाठी तिच्या नवऱ्याचीही संमती होती . त्यामुळे फिर्यादी मुलगी माहेरी राहत होती . याच काळात आरोपीने फिर्यादी मुलीच्या नवऱ्याला कॉल करून आमचे प्रेमसंबंध असल्याचे सांगितल्याने त्या दोघांचा घटस्फोट झाला होता . घटस्फोटानंतर मुलीच्या आई – वडिलांनी विचारणा केल्यावर आरोपीने लग्नाला नकार दिला .
या सर्व कालावधीत २० एप्रिल , २०२० रोजीपासून आतापर्यंत आरोपीने या मुलीचे लैंगिक शोषण केले सर्वप्रथम आपला वाढीदिवस असल्याचे सांगत तो तिला लॉजवर घेऊन गेला होता . त्यानंतर शहरातील काही लॉजमध्ये, मुलीचे आई – वडील घरी नसल्याचे पाहून घरी येऊन वेळोवेळी आरोपीने या मुलीचे लैंगिक शोषण केले . ३० नोव्हेंबर रोजीही मुलीचे आई – वडील बाहेरगावी गेल्याचे पाहून तो रात्री घरी आला आणि जबरदस्तीने अत्याचार केला . मुलीने लग्नाची मागणी त्यावेळीही केली मात्र त्याने नकार दिला होता .
आज या मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी हसन असलम मोमीन ( रा – एरंडोल ) यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गु र न ३५८/२०२१ , भा द वि कलम ३७६ ( एन ) बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४ , ५ ( एल ) , ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पो उ नि ऑन सोनार करीत आहेत.







