मेहुणबारे पोलिस ठाण्यात पॉक्सोसह बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील काकडणे येथे १५ वर्षे ८ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा आरोप असलेल्या युवकासह अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देण्यास सहकार्य केल्याच्या आरोपावरून पाच जणांविरुद्ध मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काकडणे येथील अल्पवयीन मुलीवर कृष्णा बळीराम माळी याने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने ती गर्भवती झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिचे लग्न लावून देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी कृष्णा माळी, बळीराम माळी, अंजनाबाई माळी, सखाराम ठाकरे आणि वैशाली ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह पॉक्सो कायदा तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मधील विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.४२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजणे करीत आहेत. आरोपींच्या अटकेबाबत तपास सुरू आहे.









