मुंबई (वृत्तसंस्था) – बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये एनसीबीने समन्स बजावल्यानंतर बड्या अभिनेत्रींचे धाबे दणाणले आहेत. काही दिवसापूर्वी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह चौकशीसाठी बोलावले होते. आता अक्षय कुमारने बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनवर प्रतिक्रिया दिली आहे.
अक्षय कुमार म्हणाला,’मी फक्त ऐवढेच म्हणेल की, सर्वांना एकाच नजरेतून बघू नका. हे चूक आहे, गैर आहे. मीडियावर माझा विश्वास आहे. पण मुद्दा उचलताना थोडी संवेदनशीलता बाळगा. कारण तुमची एक निगेटीव्ह न्यूज एखाद्या व्यक्तीने अनेक वर्षांपासून कमावलेली प्रतिष्ठा धुळीस मिळवू शकते. त्या व्यक्तिला उद्धवस्त करू शकते. शेवटी एकच म्हणेल की, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तेव्हा अशीच सोबत द्या. आम्ही चांगले काम करू, इतकाच विश्वास आम्ही देऊ शकतो.’